fbpx

जळगावचा युवा कलाकार शौनक नारळे याच्या अल्बमचे पुण्यात रेकॉर्डिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन नारळे यांचा चिरंजीव शौनक नारळे याच्या म्युझिक अल्बमचे पुण्यातील Dawn Studio येथे संपन्न झाले. यावेळी पंडित राहूल देशपांडे यांनी स्टुडिओला भेट देत शौनकला आशीर्वाद दिले आहेत.

या म्युझिक अल्बमचे लेखन व संगीत ही दुहेरी बाजू शौनकने सांभाळली आहे. यापुर्वी त्याचा श्री गणेश रॅप बर्‍याच लोकांनी पसंत केला होता. शौनक हा सर परशूरामभाऊ कॉलेज (एस.पी.कॉलेज) पुणे येथील फाइन आर्टचा विद्यार्थी असून, बीएच्या दुसर्‍या वर्षाला आहे.

पंडित राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीने शौनकला खूपच आनंद झाला असून, त्याच्या भावी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद लाभले ही मोठी गोष्ट आहे. शौनकच्या यशाबद्दल जळगावातील सोशल मिडीयासह विविध व्हॉटसॲप ग्रुपवर त्याचे व त्याचे पालक सचिन नारळे व अपूर्वा नारळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज