fbpx

महापौरांचा पाठपुरावा, शहरात एका दिवसात विक्रमी लसीकरण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरात आजही हजारो नागरिक लसीकरणापासून वंचित असून शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी पाठपुरावा केला होता. शहराला मंगळवारी रात्री २४ हजार हजार लस उपलब्ध झाल्या. बुधवारी एकाच दिवसात विक्रमी ६ हजार ६२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी एका दिवसात ३ हजार ७७१ नागरिकांना एका दिवसात लस देण्याचा रेकॉर्ड होता.

जळगाव शहरासाठी लस उपलब्ध करताना गेल्यावेळी महापालिकेकडून कमी मागणी नोंदविण्यात आली होती. महापौर जयश्री महाजन यांनी या संदर्भात पाठपुरावा करून मनपाचे वैद्यकीय प्रमुख डॉ.राम रावलानी यांच्या माध्यमातून शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

महापौरांच्या प्रयत्नामुळे मंगळवारी शहरासाठी तब्बल २४ हजार उपलब्ध झाल्या. महापौर जयश्री महाजन व डॉ.राम रावलानी यांनी बुधवारी शहरातील नऊ लसीकरण केंद्रावर उपलब्ध करून दिली होती.

बुधवारी विविध सामाजिक संघटना आणि मनपा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील ९ लसीकरण केंद्रावर विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली. शहरात दिवसभरात ६०६२ नागरिकांना लस टोचण्यात आली. त्यात काशीबाई उखाजी कोल्हे केंद्रावर १६४० तर छत्रपती शाहू महाराज मनपा रुग्णालयात १४०० पेक्षा अधिक जणांना लस मिळाली.

शहरात गेल्या वेळी एका दिवसात ३ हजार ७७१ नागरिकांना एका दिवसात लस देण्याचा रेकॉर्ड होता. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने लसीकरण सुरळीतपणे पार पाडत आहे. उद्या मनपाच्या सर्व केंद्रांवर लस उपलब्ध राहणार असल्याची माहिती मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज