उत्राण मंडळासाठी सात कोटीचे अनुदान प्राप्त

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दरम्यान, उत्राण महसूल मंडळासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वितरित करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यासह एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यात एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर झाले होते. यामुळे शेतकरी आर्थिक संकट सापडला होता. हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. प्रशासनानेही पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार एरंडोल तालुक्यातील उत्राण मंडळासाठी ७ कोटी ४७ लाख ९४ हजार दोनशे रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. दहा हजार ९१ बाधित शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

काही मंडळाचे अनुदान बाकी
उत्राण मंडळासाठी अनुदान प्राप्त झाले असले तरी, एरंडोल, रिंगणगाव व कासोदा या महसूल मंडळांचे अनुदान अजूनही प्राप्त झालेले नाही. त्यामुळे या तिन्ही मंडळातील बाधित शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, अनुदानासाठी प्रस्ताव आधीच पाठवण्यात आलेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -