पुन्हा पकडला बायो डिझेल वाहतूक करणारा ट्रक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज। अमीर पटेल । यावल पोलिसांच्या धडक कारवाईत अंदाजे ९० हजार रुपये किमतीचा बायोडिझेल आणि ट्रक असा एकूण ३ लाख ९० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही घटना भुसावळ रोडवरील महाराष्ट्र गुजरात ढाब्या समोर १० रोजी सायंकाळी सात वाजेच्चा सुमारास उघडकीला आली.याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की,यावल शहरातील भुसावळ रोडवरील महाराष्ट्र गुजरात ढाब्या समोर १० डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्चा सुमारास ( एम.एच.४८टी१७८३ क्र.) ट्रकमध्ये बेकायदेशीर बायोडिझेल घेवून जात असल्याची गोपनिय माहिती यावल पोलिसांना मिळाली असता. त्यानुसार पथकाने धडक कारवाई करत बायोडिझेल ट्रक ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस कारवाई करत असल्याची माहिती संशयित आरोपी शेरखान जुबेर खान राहणार काजीपूरा.ता.यावल जि.जळगाव याला मिळाल्याने ट्रक सोडून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .

यावल पोलिसांनी अंदाजे ९० हजार रुपये किमतीचा बायोडिझेल आणि ट्रक असा एकूण ३ लाख ९० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पो.कॉ.सुशिल घुगे यांच्चा फिर्यादिवरून संशयित आरोपी शेरखान जुबेरखान याच्चावर यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक विनोद खंडबहाले हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -