fbpx

ओबीसींचे आरक्षण संपवणार्‍या मोदी सरकारचा रावेर काँग्रेसतर्फे निषेध

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भैय्यासाहेब यांच्या आदेशान्वये रावेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने सर्व प्रथम बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शनिवार रोजी ११ वाजता मोदी सरकारचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. 

सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी मागितली होती परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी लपवून ठेवली त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्राचे मोदी सरकार असल्याने मोदी सरकारचा निषेध करत ओबीसींच्या मागे त्यांच्या न्याय मागण्या मान्य होईपर्यंत रावेर शहर आणि काँग्रेस ओबीसींच्या पाठीमागे उभी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मोदी सरकारचा निषेध

यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेशवर महाजन म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने अघोषित आणीबाणी चालवलेली आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचे महापाप मोदी सरकार करत असून संविधानाचा घात करणार्‍या मोदी सरकारचा धिक्कार करत, मोदी सरकारचा निषेध केला.

यांचा होता आंदोलनात सहभाग

यावेळी सदर कार्यकमाला तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,माजी जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील, सेवादल चे भरत कुंवर,  राजीव सुर्वेने, मनिषा पांचपाडे महिला अध्यक्ष,उपाध्यक्ष मानसी पवार . रुपाली परदेशी, रामदास लहासे, प्रकाश सुरदास,  मुंजलवाडी चे संरपंच योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, सुर्यभान चौधरी, गुंणवत सातव, तालुका उपाध्यक्ष अँड योगेश गजरे, संतोष पाटील शहर उपाध्यक्ष ,बिसन सपकाळ पिपल्स् बॅकेचे उपाध्यक्ष, भुषण चौधरी, श्रावण मेंढे, सऊद शेख, धुमा तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मोदी सरकारचा निषेध असो, जय जवान जय किसान, छत्रपती शाहू महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज