fbpx

खळबळजनक : नोकरीच्या आमिषाने बँक शाखा व्यवस्थापकाचा युवतीवर अत्याचार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । रावेर : रावेर तालुक्यातील दोधे येथील एका २३ वर्षीय युवतीला नोकरीचे आमिष दाखवत खानापूर येथील सेट्रल बँक आँफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने अत्याचार केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोधे येथील २३ वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार, संशयीत शाखा व्यवस्थापक नितीन यशवंत शेंडे याने तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जवळीक साधून शारीरीक संबध ठेवले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने रावेर पोलिसात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आला. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, उपनिरीक्षक मनोहर जाधव करीत आहेत.
दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज