स्वस्त धान्य दुकानदाराने परस्पर दुसऱ्यालाच दिले धान्य

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० जुलै २०२१ | शहरातील प्रेम नगरात राहणारी एक महिला केशरी कार्डधारक असून गेल्या दोन वर्षापासून त्यांना रेशन दुकानदार धान्य देत नाही. दरम्यान, महिलेच्या नावावर इतर कुणाला तरी धान्य देण्यात आल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला असून त्यांनी या संदर्भात तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.

शहरातील नंदा विनायक इंगळे राहणार प्रेम नगर येते वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे केशरी कार्ड असून दोन वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार त्यांना धान्य देत नाही. महिलेला लॉकडाऊनमध्ये शासनाने मंजूर केलेले धान्य देखील मिळत नसल्याने सदर महिलेने तक्रार दिली आहे.

दुकानदार डी.गु.मोरे यांच्याकडे चार-पाच वेळा जाऊन आल्या तरी धान्य देण्यास टाळाटाळ केली म्हणून सदर महिलेने ऑनलाइन चेक केले असता हे धान्य दुसरे कुणीतरीच घेतलेले असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. याबाबत महिलेने देखील रेशन दुकानदाराला जाब विचारला असता तुमचे नाव यादीत नाही, तुमचे नाव यादीत दिसणार नाही अशी धमकी त्याने दिली असल्याचे नंदा इंगळे यांनी सांगितले.

शासनाने चाळीस किलो धान्य हे मंजूर केले असले तरी सदर महिलेस केवळ दहा किलो धान्‍य घेऊन जा असे सांगण्यात आले. धान्याचे शासकीय दर भरण्यास महिला तयार आहे तरीही त्यांना धान्य मिळत नसल्याने त्यांनी तक्रार केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यामुळे रेशन धान्याची गरज सर्वसामान्य ग्राहकांना पडत आहे मात्र अशा या घटनेने सर्वसामान्यांचे जीवन बिघडले असून रेशन दुकानदार जनतेस वेठीस धरत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -