राष्ट्रीय जनक्रांती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नितीन नाईक तर युवा जिल्हाध्यक्षा प्रियंका सिंग नाईक

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । जामनेर येथे भुसावळ रोड वरील राष्ट्रीय जनक्रांती पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिम्मतराव कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यात जळगांव जिल्हाध्यक्ष पदी नितीन नाईक तर युवा जिल्हाध्यक्षा म्हणून प्रियंका सिंग नाईक यांची निवड करण्यात आली.

दोघांनाही नियुक्ती पत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सर्व सामान्य जनतेच्या सेवे साठी जबाबदारी सोपविण्यात आले. या वेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष  नितीन नाईक यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करील युवक जिल्हाध्यक्षा प्रियांका सिंग नाईक  यांनीही पक्ष वाढीसाठी व जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.

राजमाता जिजाऊ व शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मीय, शेतकरी, आदिवासी, अठरापगड जातसमुहातील मावळ्यांनी यासाठी आपले योगदान लोककल्याणारी विचारधारा व प्रेरणा या पाठीमागे होती. आजच्या लोकशाही शासनव्यवस्थेचा पाया शि शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर ही विचारधारा संविधानात अंतर्भूत झाली. सामाजिक, सांस्कृतिक, अ राजकीय गुलामगिरी संपवण्यासाठी महामानवाचे विचार मस्तकात घेऊन संघर्ष करावा लागेल.

राष्ट्रिय जनक्रांती पार्टी हा लढा लढत आहे आणि सर्वांसाठी लढत राहील. कारण ही पार्टी क्रांत आज शिवरायांच्या भूमीत शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. आज बरेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. युवकांना रोजगार नाही, नोटबंदी, जी.एस.टी., सरकारपुरस्कृत उन्माद, सरकारी अनुदानित शाळा बंद करणे या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. भावनिक प्रश्न आणून आमचे हक्क, अधिकार नाकारण्याचे हे षडयंत्र आहे. स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांनी आलटू पालटून सत्ता भोगली आणि जनतेला कंगाल केले आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रबोधन करुन सत्तापरिवर्तन घडवू राष्ट्रिय जनक्रांती पार्टी २०१४ पासुन २१ राज्यात कार्यरत आहे.यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन महामानवाचे विचार, लोकशाही व भारताचे संविधान बळकट करण्यासाठी प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी , पूर्णवेळ विज, पाणी व शेतीसाठी बियाणे मोफत मिळावे ,शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा १००००/- रुपये पेन्शन मिळावी ,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत व शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा ,विकासकामासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला भागीदार करावे व ७/१२  शेतकऱ्याच्या नावेच रहावा.

शिक्षण व आरोग्यसर्वाना अंगणवाडी ते पदव्युत्तर शिक्षण मोफत पुरविणे , संपूर्ण देशभर एकाच दर्जाचा गुणवत्ता पूर्ण अभ्यासक्रम लागू करावा,अद्ययावत सरकारी दवाखाने देशभर निर्माण करुन मोफत आरोग्य सेवा पुरविणे,रोजगारकंत्राटी नोकरभरती बंद करावी,सर्वच शासकीय क्षेत्रातील नोकरी भरतीवरील बंदी उठवावी व तात्काळ नोकरभरती सुरु करावी, ग्रामीण भागात उद्योग उभे करून स्थानिकांना रोजगार द्यावा, स्वयंरोजगारासाठी तरुणांना विनातारण कर्ज पुरवठा करणे,महिलांना सक्षम, सुरक्षित व सर्वच क्षेत्रात समान संधी मिळेल अशी व्यवस्था व कायदे करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे. कर्जबुडव्या उद्योगपतींना व त्यांना मदत करणान्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करुन शासन करणे व त्यांची संपत्ती जप्त करणे.

आदिवासीचे वनवासीकरण थांबवून त्यांना जल, जमीन, जंगल व शिक्षणाचे अधिकार देणे. दारु, गुटखा, सिगारेट तसेच इतर अमली पदार्थ इत्यादींवर १००% बंदी घालून लोकांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण थांबविणे.मेट्रो, बुलेटट्रेन, समृद्धी महामार्ग इ. प्रकल्प सध्या रद्द करून तो पैसा इतर मुलभूत गरजेच्या बाबींवर वापरणे, जातनिहाय जनगणना करुन सर्व वंचित घटकांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज, अहिल्याराणी होळकर, अण्णाभाऊ साठे इ. महामानवांची स्मारके भव्य प्रमाणात उभारावीत व त्यांचे चरित्र, विचारांचा प्रचार प्रसार करावा. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळाचे राष्ट्रीयकरण करून तेथील पैसा, शेती, शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मतीवर वापर करावा.जितेंगे तो संसद मे लढेंगे ! हारे तो सडकपर लढेंगे !! लेकीन हमारी लढाई जारी रहेगी अशी घोषणा करीत राष्ट्रीय जनक्रांती पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष हिम्मतराव कोरडे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या कार्यप्रणालीची माहिती दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज