धक्कादायक : वकिलाकडून विवाहितेवर अत्याचार, फोटो केले व्हायरल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । शहरातील एका वकिलाने परिचयातील एका महिलेशी जवळीक साधत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या पतीला याबाबत वकिलाने माहिती दिल्याने पतीने संबंध तोडले. त्यानंतर वकिलाकडून धमक्या दिल्या जात होत्या. वकिलाने शरीर संबंधांचे फोटो व्हायरल केल्याने अखेर पीडितेने याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजेश साहेबराव गवई असे वकिलाचे नाव आहे.

शामनगरात राहणाऱ्या राजेश साहेबराव गवई या वकिलाने परिचयातील एका महिलेशी प्रेमसंबंध निर्माण केले. प्रेमसंबंधांच्या बहाण्याने वकिलाने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर पीडितेचे वकिलासोबत वाद निर्माण झाल्याने गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. पिडीतेसोबत शारीरिक जवळीक साधत तिचे फोटो आणि व्हिडीओ घेतले.

वकिलाने पीडित महिलेचा मुलगा आणि भावाला फोटो, व्हिडीओ पाठविल्याने अखेर पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश गवई सरकारी अभियोक्ता असताना देखील त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -