fbpx

तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत केला अत्याचार ; तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । भुसावळ तालुक्यातील टहाकळी येथील २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर एका तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तरूणाविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, टहाकळी गावात राहणारी २४ वर्षीय तरूणी शेती काम करून आपल्या कुटुंबाला हाथ भार लाऊन आर्थीक मदत करते. दरम्‍यान संशयित आरोपी दिनेश उर्फ दिनकर मोतीराम कुंभार (वय २५, रा. टहाकळी ता. भुसावळ) याने तरूणीला आपल्या प्रेमाच्‍या जाळ्यात ओढून शारीरीक संबध प्रस्थापित केले. तसेच लग्नाचे खोटे आमिष दाखवत १० ते १२ वेळा टहाकळी शिवारातील जंगल भागात वारंवार अत्याचार केला. 

सदरचा घडलेला प्रसंग कोणाला सांगायचा नाही; असे केले तरच तुझ्याशी लग्न करेल असे तरूणाने सांगितले. मात्र दिनेश कुंभार घडलेला विषयच लक्षात घेत नसल्यामूळे आपली फसवणूक होत असल्याचे पीडितेला कळताच तरूणीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणाविरुद्ध फिर्याद दाखल केली. संशयित आरोपी दिनेश कुंभार याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगरचे विभागीय पोलिस अधिकारी डीवायएसपी विवेक लवांड करीत असुन सशंयीत पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज