पहूर हादरले ; सहा वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संशयित नराधमास ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक केली आहे.

 

पहूर येथे पीडित सहा वर्षीय मुलगी आईवडिलांसह राहते. काल शनिवारी दुपारी बाराच्या वाजता पीडित मुलगी शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी गावातच राहणाऱ्या ४० वर्षीय संशयिताने मुलीला फूस लावून उचलून नेले. गावाजवळील निर्जन ठिकाणी तिला नेले. तिथे तिच्यावर या नराधामाने अत्याचार केले. हा प्रकार पीडित मुलीच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पहूर पोलिसांत धाव घेतली.

 

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देवरे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज