⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | ‘त्या’ जागा भाजपकडूनच लढवल्या जातील; महायुतीमधील जागावाटपाबाबत रक्षा खडसे काय म्हणाल्या..

‘त्या’ जागा भाजपकडूनच लढवल्या जातील; महायुतीमधील जागावाटपाबाबत रक्षा खडसे काय म्हणाल्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीकडून जोरदार तयारी केली जात असून मात्र जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसून जागावाटप कशा प्रकारे केले जाते हे पाहणं महत्त्वांचं ठरणार आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जागांबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?
जिथे भाजपचे आमदार आहेत त्या जागा भाजपकडूनच लढवल्या जातील. महायुती म्हणूनच येणारी निवडणूक लढवू प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. वरिष्ठांनी आदेश दिला आहे, महायुती म्हणून तीन पक्ष सोबत मिळून निवडणूक लढायची आहे. शिंदे गटाचे अजितदादा गटाचे कार्यकर्ते सोबत आहेत सर्व मिळून निवडणुकीला सामोरे जायचे. नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभांची जबाबदारी दिली आहे. जे आम्ही लोकसभेला अनुभवलं ते काही होऊ नये याची दक्षता आमच्याकडून घेतली जात असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

थोड्याफार फार प्रमाणात मतभेद असतात. घरात चार लोक राहतात मतभेद होतात हा मोठा पक्ष आहे मतभेद होतीलच. ते आमच्याशी चर्चा करतात जेणेकरून आम्ही वरती विषय पोहोचवू शकतो. थोड्याफार अडचणी सगळीकडे असतात. आमदारांवर लोकप्रतिनिधींवर नाराज आहे असं काही नाही. कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत असतो. छोट्या मोठ्या विषयांवर चर्चा झाली. सूचना देण्याचे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. उमेदवारी मागणी गुन्हा नाही पक्ष ठरवते कोणाला उमेदवारी द्यायचे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचं असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

नाथाभाऊंनी लोकसभेला मला पाठिंबा दिला, माझ्यासाठी काम केलं. भारतीय जनता पार्टीत येण्याची इच्छा ही व्यक्त केली. तो नाथाभाऊंचा व्यक्तिगत विषय असल्याचंही रक्षा खडसे यावेळी सांगितलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.