fbpx

भाजप की राष्ट्रवादी या कुंपणावर बसू नका; काय ती एक ठोस भूमिका घ्या

रक्षा खडसे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यानंतर रक्षा खडसे यांच्याविषयी देखील नवनवीन चर्चा सुरु असतात. रक्षा खडसे नेमक्या भाजपमध्ये आहेत कि राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, रक्षा खडसे यांनी सावदा येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये तर रक्षा खडसे भाजपमध्ये असल्याने अनेक कार्यकर्ते कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपच्या कार्यक्रमात दिसून येतात. यावरूनच रक्षा खडसे यांनी नगरसेवक व कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले कि, आगामी पालिका निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांनी संघटन कार्याला गती द्यावी व भारतीय जनता पक्षाची मजबूत फळी उभी करून व्यापक जनहिताचे कार्य करावे.

भाजप की राष्ट्रवादीच्या कुंपणावर न बसता कोणती तरी एक स्पष्ट ठोस भूमिका घेऊन पक्षकार्य करावे, असा टोला देखील त्यांनी यावेळी काही पदाधिकाऱ्यांना लगावला. सावदा येथील खिरोदा रस्त्यावरील गणपती मंदिरात बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सुरेश धनके, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, नगराध्यक्षा अनिता येवले, डॉ. अतुल सरोदे, शिवाजी पाटील, महेश चौधरी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अजय भारंबे, लीना चौधरी, करुणा पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज