fbpx

अनाथ निराधार मुलांनी पाठवल्या सैनिकांना राख्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । एरंडोल तालुक्यातील खडके बु येथील कै य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित मुला-मुलींचे बालगृहातील अनाथ निराधार मुल आणि मुलींच्या मनात ब-याच दिवसापासून असलेली एक राखी कर्तव्याची ही सुप्त कल्पना होती. ती आज मैत्री सेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पुर्ण होत असून घरदार सोडून सीमेवर भारत मातेचे रक्षण करणा-या भारतमातेच्या सुपुत्रांसाठी संस्थेतील बालकांनी प्रत्यकी एक राखी आणि सैनिकांप्रती असलेली भावना व्यक्त करणारे पत्र तयार करुन अधिक्षकांकडे जमा केले. आणि पुढे सर्व पाकीट मैत्री सेवा फौंडेशन चे सन्माननीय अध्यक्ष आणि सदस्य यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

ते सैनिकांपर्यत पोहचविण्यास मोलाचे सहकार्य होणार आहे.या आधीही संस्थेतील बालकांनी देशासाठी वीरमरण पत्करलेल्या जवनांना श्रध्दांजली म्हणून एक दिया शहिदोके नाम असा उपक्रम केला होता. या माध्यमातून बालकांमधे देशभक्तीची भावना जागृत होईल हा उद्देश आहे.

संस्था चालक प्रभाकर पाटील  यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, गणेश पंडीत, तुषार अहिरे, सौ.अरुणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज