पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगाव येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक रेखा पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या भूमिका साकारून त्यांच्या जीवन कार्याचा उजाळा दिला. काहींनी भाषणे केली तर काहींनी सुंदर ओव्या सादर केल्या, तर काहींनी नाटक सादर केले. शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवले तर विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची माहिती करून दिली.

कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील, अशोक चौधरी व कायनात यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -