रायसोनी महाविद्यालयाचे जलतरण स्पर्धेत यश

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । जळगाव येथील जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील प्रतिक रजनीकांत काळे व भरत दिलीप चौधरी या विद्यार्थ्यानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत यश संपादन केले.

१०० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात बीसीए तृतीय वर्षाचा विध्यार्थी प्रतिक काळे याने प्रथम तर ५० मीटर ब्रेडस्टोक या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला तर भरत चौधरी या बीसीए प्रथम वर्षाच्या स्पर्धकाने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात द्वितीय तर १०० मिटर फ्रीस्टाईल या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल, प्रा.रफिक शेख, प्रा.मकरंद वाठ, प्रा.भूषण राठी, प्रा.संजय महाजन, प्रा.राहुल त्रिवेदी, प्रा.गौरव जैन, प्रा.प्रशांत देशमुख, प्रा.अविनाश पांचाळ, प्रा.गणेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. इन्स्टिट्यूटचे क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar