बास्केटबॉल स्पर्धेत रायसोनी महाविद्यालय तृतीय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या संघाने तृतीय क्रमांकाचा मान पटकावला.

नूतन मराठा महाविद्यालयाच्या आउटडोअर मैदानात हे सामने पार पडले. यात हर्षल पाटील, हार्दिक जैन, तन्मय देशमुख या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली तसेच यावेळी सर्व विजयी खेळाडूंना उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. ए. गायकवाड यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. तसेच रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल, ऍकेडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेतील या विजयी खेळाडूना रायसोनी महाविध्यालयाचे क्रीडा संचालक संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -