“राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकथॉन” स्पर्धेत जळगावचा ठसा ; मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रायसोनीच्या विध्यार्थ्यांचे कौतुक
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ स्पर्धेत जळगाव शहरातील नामंकित जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला असून, राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाविद्यालयाचा ठसा उमटवला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्पर्धकांशी संवाद साधत आपल्या भारतात अजूनही ज्या काही समस्या आहेत जसे कि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, टूरीजम, कल्चरल, फायनान्स, अॅग्रीकल्चर यासह विविध विभागातील जे प्रश्न आहेत त्यांचे सर्व इत्यंभूत उपाय हे आजच्या युवकांमध्ये आहे असे त्यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले.
“ऑल इंडिया कोंसील फॉर टेक्निकल एज्युकेशन” तर्फे नुकतीच ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन-२०२२’ ही राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत खान्देशातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड होत त्यांनी हॅकथॉन’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तसेच भारताचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्ताने संपूर्ण भारतात ७५ नोडल सेंटरवर प्राथमिक फेरीत पात्र झालेल्या विध्यार्थ्यांना याठिकाणी बोलवण्यात आले होते त्यातील केरळ व इंदोर या नोडल सेंटरवर जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२ हा देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात व आपल्या नवकल्पनांचा, आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करतात. जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल. तसेच तंत्रज्ञानासंबंधित येणाऱ्या विविध समस्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून न राहता आपल्याच देशात सर्व समस्याचे निराकरण झाले पाहिजे हा या स्पर्धेचा उद्धेश असून शासनाला येणाऱ्या विविध स्थानिक समस्याही या स्पर्धेत विध्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही स्पर्धा घेतली जात असते. या अनुषंगाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील अनेक प्रकल्पांना मागे टाकत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्याच्या दोघही संघांनी प्रत्येकी एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिक मिळवत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. या उपक्रमासाठी प्रा.स्वाती पाटील, प्रा. डॉ. शंतनू पवार प्रा.सौरभ नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विध्यार्थ्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.
ग्रामीण विकास मंत्रालय याच्या तर्फे दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्याला कमी करण्यासाठी व्हाईट कोल अॅश जिओपोलिमर काँक्रिट हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे काँक्रिट सिमेंट आणि पाण्याशिवाय बनू शकते,तसेच त्यामध्ये विद्यार्थ्यांनी एक ग्राफिकल इंटरफेस दिला त्यामध्ये कुठलेही बांधकाम क्षेत्रातील पावडर प्रकारातील मटेरियलचे कार्बन इमिशन काढू शकतो. तसेच कुठलाही प्रकारच्या जिओपोलीमर काँक्रिटचे एका क्लिक वर मिक्स डिझाईन मिळू शकते. जिओपोलीमर काँक्रिटसाठी एक विशिष्ट असा मापदंड सध्या नाही या मुळे बांधकाम शेत्रातील व्यक्तींना हे फायदेशीर ठरेल. या संपूर्ण प्रकल्पावर विद्यार्थ्यांनी ३६ तास अखंड काम करून संपूर्ण भारतामध्ये ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
संगणक अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यानी “सर्च इंजिन फोर वेदाज रिलेटेड टेक्स्ट वर्ड” या विषयावर प्रकल्प सादर केला होता. हे एक शब्द शोध इंजिन आहे. भारतीय वेदांमध्ये असंख्य शब्दांचा समूह आहे. त्या शब्द समूहाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय नॉलेज विभागातर्फे विद्यार्थ्यांना हे सर्च इंजिन बनवायचे होते. म्हणून विद्यार्थ्यांनी हे सर्च इंजिन अशा प्रकारे बनवले कि त्या मध्ये इंग्लिश किंवा हिंदी किंवा मराठी शब्द टाकता येतो. तसेच ज्यांना लिहिता येत नाही ते लोक हा शब्द उच्चारून सुध्दा त्या शब्दाचा अर्थ वरील दिलेल्या या ३ भाषांमध्ये त्यांना समजतो किंवा ती आपण ऑडिओ द्वारे देखील ऐकू शकतो. तसेच दिलेला शब्द हा कोणत्या वेदांमधील कोणत्या खंडात आणि कोणत्या श्लोकात येतो त्या श्लोकाचा क्रमांक कोणता आहे हे हे देखील शोधता येते. अशा प्रकारे वेदांचा अभ्यास करण्यासाठी हे अँप्लिकेशन म्हणजे ऑल इन वन अँप्लिकेशन आहे. या प्रकल्पासाठी ऐश्वर्या लुणावत, वरद साखरे, माधुरी घुगे, मोनिका महाजन, यश सोनार, दिव्या सुरवाडे या विद्यार्थ्यांनी काम केले.