जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी, खरीप हंगाम धोक्यात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. पावसाने दोन महिने उलटून गेले तरी आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाच्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस होईल असे वाटत होते. परंतु पावसाने पाऊस ढगाआड लपल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकून दिल्या आहेत. त्यांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगामावर अरिष्ट आल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. जूनमध्ये वेळेवर पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र आता दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविली होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाच्या सलामीने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यानंतरही पावसाने हजेरी लावली. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पाठ दाखविल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र अंतिम क्षणी पावसाने हजेरी लावल्याने कशीबसी पिके वाचली. मात्र आता पुन्हा पाऊस ढगाआड लपल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी पंधरा दिवसांपासून पावसाच्या विवंचनेने हवालदिल झाला आहे. मायबाप सरकारने पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पाऊस तरी पाडावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाच्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात जवळपास चार लाख ३३ हजार ५११ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यात दोन लाख ११ हजार क्षेत्रावर पूर्वहंगामी म्हणजे बागायती कापसाची लागवड करण्यात करण्यात आली आहे. ती वगळता दोन लाख २४ हजार १७५ हेक्टरवर वरुणराजाच्या भरवशावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. तीच लागवड सध्या पूर्णपणे धोक्यात आली आहे.

दरम्यान, ऑगस्टमध्ये १९६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे, पण आठवडा उलटला तरी अजून पावसाने तोंडच दाखवलेले नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -