fbpx

जळगाव जिल्ह्याकडे पावसाची पाठ, गेल्या ४० दिवसांत ११ दिवसच पाऊस

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । राज्यातील अनेक भागात पावसाने कहर केला. मात्र, जळगाव जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जुलै महिना संपून ऑगस्ट महिना  आला तरी जिल्ह्यात सरासरीच्या आवघा ४० टक्के पाऊस झालाय. गेल्या ४० दिवसांमध्ये अवघे ११ दिवसच पाऊस बरसला आहे. यंदाची वाढती पावसाची तूट खरीप हंगामापुढचे सर्वात माेठे संकट ठरले आहे. जलसाठे जेमतेम असताना पावसानेही पाठ फिरवल्याने शेतीपाठाेपाठ पिण्याच्या पाण्याचेही संकट निर्माण हाेण्याची भीती आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रिमझिम सुरु आहे. याच रिमझिम पावसावर खरिपाची पिके उभी असून जलसाठे मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात जूनअखेर केवळ ३१ टक्के एवढाच जलसाठा हाेता. ऑगस्ट महिन्यात जलसाठ्याची टक्केवारी ३५ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. म्हणजे गेल्या दाेन महिन्यांत केवळ चार टक्केच जलसाठा वाढला आहे.

जुलै महिन्यासह जूनच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण ४० दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी केवळ ११ दिवसच तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. रिमझिम पावसावर खरिपाची पिके उभी असून जलसाठे मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट भरून न निघाल्यास पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे आणि भूजलपातळी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्यात १८९.२ मिलिमिटर सरासरी पाऊस हाेणे अपेक्षित असताना केवळ ११४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. महिन्याच्या सरासरीच्या ६०% पाऊस झाल्याने ४० टक्क्यांची तूट निर्माण झाली. ऑगस्ट महिन्यात १९६.१ मिमी पाऊस अपेक्षित आहे.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पात ४५ टक्के साठा आहे, जाे मागील वर्षी याच तारखेला ८३ टक्के हाेता. तर ९६ लघु प्रकल्पांमध्ये ९ टक्केच जलसाठा आहे. मागील वर्षी हा साठा ४६ टक्यावर हाेता. त्यामुळे पावसाच्या तुटीचा सर्वाधिक परिणाम जलसाठ्यांवर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट भरून न निघाल्यास पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे आणि भूजलपातळी खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज