⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावमध्ये पावसात खंडाचा कालावधी कमी राहणार? IMD कडून राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर

जळगावमध्ये पावसात खंडाचा कालावधी कमी राहणार? IMD कडून राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । यंदा वेळेआधी मान्सून केरळात धडकला असून त्याचा पुढील प्रवास सुरु असून लवकर महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे. अशामध्ये हवामान खात्याने महाराष्ट्रात यंदा किती टक्के पाऊस पडणार याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

यावर्षी मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. रामचंद्र साबळे यांनी आज राज्यातील पावसाचा अंदाज काय असणार आहे? हे सांगण्यासाठी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी ही महत्वाची माहिती सांगितली. दरम्यान, यावर्षी जळगावमध्ये पावसाचा खंडाचा कालावधी कमी रहाण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते पावसाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने मान्सून कधी येणार याची अपडेट दिली होती. केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन लवकर होणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनमध्ये सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारीत आहे. वाऱ्याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावधी आणि तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाडी, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड रहाण्याची शक्यता आहे.

तसंच, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव आणि परभणी येथे खंडाचा कालावधी कमी रहाण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील आणि कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असेल अशाप्रकारचे हवामान राहणार असल्याचा अंदाज यावेळी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.