⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | हवामान | पुढचे पाच दिवस धोक्याचे ; राज्यातील ‘या’ भागात अती मुसळधार पावसाचा इशारा

पुढचे पाच दिवस धोक्याचे ; राज्यातील ‘या’ भागात अती मुसळधार पावसाचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरु असून आता पुढचे पाच दिवस धोक्याचे असणार आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबाकडून (Regional Meteorological Center Colaba) जिल्हयानिहाय पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील पालघर, रायगड रत्नागिरीत अतीवृष्टीचा इशार देण्यात आला आहे. यासह पुणे आणि साताऱ्यात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान केंद्राने 9 ते 13 जुलै पर्यंत हा अलर्ट जारी केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांतून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

मुंबईत हाय टाईड येण्याची शक्यता
मुंबईत थोड्या थोड्या विश्रांतीने पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने याबाबत अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात हायटाईड येण्याची शक्यता असल्याने चौपाटी किंवा समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत शनिवारी हाय टाईड येण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या काळात 3.6 मीटरच्या म्हणजे सुमारे 11 फूटांच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नदीकाठी असणाऱ्या गावांना इशारा
पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावसह अहमदनगर नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस
तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, अहमदनगरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विजांसह गडगडाट
ढगांच्या गडगडाटासह विजांसह जोरदार वारा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत, तर काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.