पावसाच्या सरींनी वाढणार थंडीचा कडाका

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । बदलत्या वातावरणामुळे थंडीत देखील वाढ-कमी होत असल्याचे जाणवून आले. कधी तापमान अचानक वाढतेय तर कधी अचानक तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतोय. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात किमान तापमानात चार अंशाची घट होऊन तापमान १२ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे थंडी वाढली होती. आणखी दोन दिवस थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. किमान तापमानात चार अंशाची घट होऊन तापमान १२ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारपर्यंत तापमान कमी राहणार आहे. उत्तरेतून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात जिल्ह्यात वातावरण कोरडे राहील.

उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तसेच पावसासोबत काही ठिकाणी गारपीट झाल्याने गारठा वाढला होता. आता ढगाळ वातावरण निवळल्याने, पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पारा आणखी खाली जाण्याची शक्यता, व्यक्त होत आहे.

दरम्यान, भुसावळ शहरासह विभागात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते, दुपारनंतर मात्र आकाश निरभ्र झाले. शनिवारी रात्री काही ठिकणी तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमाल व किमान तापमानात तफावत निर्माण होत आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १९.२, तर सोमवारी १२.८ अंशांची नोंद झाली. एकाच दिवसांत तापमान ६.४ अंशांनी घसरले. यामुळे वातावरणात गारठा वाढला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -