fbpx

अखेर जळगावात कोसळल्या पावसाच्या सरी ; उकाड्यापासून दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात तब्बल अठरा वर्षानंतर जुलै महिन्यात मे हिटचा अनुभव आला होता. पावसाने दडी मारल्याने पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेल्याने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पारा उतरला असून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तापमान ४० अंशाच्या पलीकडे पोहोचले होते. जुलै महिन्यात पहिल्यांदाच पारा ४० अंशाच्या पार गेल्याने उकाड्याने नागरिक बेजार झाले होते. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू करावे लागले. पावसाचा मागोवा नसल्याने सर्वच बेजार झाले होते. 

दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? अशा चिंतेने शेतकरी राजा चिंताग्रस्त होता. बुधवारपासून अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने सायंकाळी पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पारा ४० अंशाच्या खाली आला असून २५ ते ३० अंश सेल्सिअसमध्ये स्थिरावला आहे. आज शुक्रवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. नागरिकांना या वातावरणाने दिलासा मिळाला असला तरी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज