fbpx

राज्यात आजपासून चार दिवस पाऊस ; उत्तर महाराष्ट्र कोरडाच

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनच्या पावसाचं पुन्हा पुनरागमन झालं असून आजपासून पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्राकडे कानाडोळा असून मोठी तूट पडली आहे.

जूनमधील १५ दिवसांच्या खंडांनंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. नऊ जुलैपासून पावसाने कोकणासह प. महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला भरभरुन माप दिले आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्राकडे कानाडोळा केला. नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांत मात्र पावसाची मोठी तूट पडली आहे.

पुणे वेधशाळेनुसार, राज्यात आज दि. १३ ते १६ जुलै दरम्यान सर्वत्र पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात या काळात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा जोर या काळात काहीसा कमी राहील. या पावसाकडे खान्देशवासीयांच्या आशा लागल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt