⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पावसामुळे शेतकरी चिंतेत! जळगाव जिल्ह्यात आज कशी असणार पावसाची स्थिती?

पावसामुळे शेतकरी चिंतेत! जळगाव जिल्ह्यात आज कशी असणार पावसाची स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. जळगावसह राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जळगावसह राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस पावसाचे राहणार आहे. आज रविवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याबाबतचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. Rain Alert In Jalgaon District

जळगाव जिल्ह्याला 11 ऑक्टोबरपर्यंतचा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजही जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला होता. मात्र दसऱ्यापासुन जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.  आधीच मागील गेल्या काही दिवसात झालेल्या या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात सापडलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचा प्रभाव कायम आहे.  पुढचे 3 दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आज पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.