fbpx

ना परीक्षा ना मुलाखत…दहावी उत्तीर्णांना थेट रेल्वेत नोकरीची संधी, १६६४ रिक्त जागा

mi-advt

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना १६६४ पदांवर अप्रेंटिस करता येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

पात्र उमेदवार 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना प्रयागराज, आग्रा, झाशी विभागात अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल. अप्रेंटिस भरती प्रक्रिया आणि इतर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार rrcpryj.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

अप्रेंटिस पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीत प्राधान्य
रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वतीने अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अप्रेंटिस जाहीर झालेल्या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया 02 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. अप्रेंटिस साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 1 सप्टेंबर आहे. रेल्वेतील लेव्हल एकच्या पदांमध्ये भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस करणाऱ्यांसाठी 20 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार ते 56900 रुपये वेतन दिलं जाईल.

शैक्षणिक पात्रता
रेल्वेतील अप्रेंटिस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. तर, वेल्डर, वायरमन आणि कार्पेंटर या पदासाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

परीक्षा फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणताही शुल्क आकारलं जाणार नाही.

निवड प्रक्रिया : गुणवत्ता यादी च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, असं कळवण्यात आलंय.

जाहिरात (नोटिफिकेशन) : PDF 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज