रेल्वे मालधक्का माथाडी कामगार युनियनतर्फे हमाल बांधवांना मिठाई वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील रेल्वे मालधक्का माथाडी कामगार युनियनतर्फे ४५० कष्टकरी हमाल बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली तर ५० महिला बघिणींचा साडी व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, सागर सोनवणे, योगेश गालफाडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश बाविस्कर, केशव पोळ, लक्ष्मण पोळ, विजय पुरोहित, सचिन पुरोहित, सिताराम पुरोहित, राधेश्याम व्यास, माथाडी निरीक्षक श्री. वाघ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी लहू हटकर, राजू भाट, विक्की माने, संतोष हटकर, सुरेश बाविस्कर, राजू जोंटी, भिकन शेख, ब्रिजलाल नाईक, धनसिंग पवार, शंकर ठाकूर, छोटू कोळी, विजय पवार, चतरु मामा, वना पाटील, अशोक जाधव, मधुकर रोकडे, घनश्याम जगताप, अजय नाईक, गजानन ठाकरे, दरबार चव्हाण, शब्बीर बाबा, पवन पाटील आदींसह सर्व हमाल, माथाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज