fbpx

एरंडोल उञाण रस्त्यावरील दगड व मुरुमाच्या खदानीवर नासिक उपायुक्त पथकाची धाड

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । अँग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्या तर्फे एरंडोल लगतच्या राष्ट्रीय महामार्ग सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून या कामासाठी लागणारा मुरुम व दगड एरंडोल उञाण रस्त्या लगत असलेल्या त्यांच्या मालकीच्या खदानीवरुन नेला जातो उपायुक्त कार्यालय नासिकच्या पथकाने गुरुवारी दूपारी सदर खदानीवर धाड टाकली व तपासणी केली.

या वेळी प्रभारी तहसीलदार एस.पी.शिरसाठ यांना पाचारण करण्यात आले. या वेळी काही वाहने ओव्हर बर्डन आढळून आली. मुरुम व दगड भरलेल्या दोन वाहनांसह चार रिकामी वाहने जप्त करण्यात आली. सदर वाहने एरंडोल पो. स्टे. ला जमा करण्यात आली आहे तसेच गौणखनीज वाहतूकी संबधी आवश्यक असलेले परवाने परमीट व चलन तपासणी वेळी सादर करण्यात आले नाही. पथकातील चार अधिकारी व प्रभारी तहसीलदार एस.पी.शिरसाठ यांनी कारवाई केली.

जप्त करण्यात आलेली वाहने पुढील प्रमाणे मुरुम भरलेले ट्रेक टर कमांक  एम.एच.१९ बीजी ६५६७,दगड भरलेला टाटा ट्रक एम एच १८ बीजी ११३०, रिकामी वाहने ट्रेकटर कमांक. एम एच १९ सी वाय ५५३४ ,जे सीबी कमांक एम एच १९ बीजी ३६९१, टाटाट्रक कमांक एम एच १९ सी वाय ५५७३,टाटाट्रक कमांक एम एच १८ बीजी १२०५ दरम्यान अवैध रीत्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्याची इंडिकेटर लागले आहे. ३० जूलै अखेर परवाने परमिट चलन वाहतूक पासेस संबंधित ठेकेदाराला तहसील कार्यालयात सादर करावी लागणार आहे अन्यथा दंडात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज