जळगावात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा, ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । अवैधरित्या गुटखा व पानमसाला विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर छापा टाकून ९१ हजार ४९३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आल आहे. ही घटना जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्लीत घडलीय. दरम्यान, याबाबत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, शहरातील सिंधी कॉलनीतील राजाराम नगर आणि तिजोरी गल्ली भागात अवैधरित्या आणि विना परवाना गुटखा आणि पानमसालाची साठवणूक होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने काल रात्री छापा टाकला.

असा केला मुद्देमाल जप्त 

या कारवाईत राजाराम नगरातील संतोष हुकमतमल राजपाल यांच्या घरात ६७ हजार ५९५ रूपये किंमतीचे गुटखा आणि पानमसालाचा साठा आढळून आला. संतोष राजपाल याच्या मालकीचे तिजोरी गल्लीतील मिरा ट्रेडर्स नावाच्या दुकानातून २३ हजार ८९८ रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत एकुण ९१ हजार ४९३ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी पो.कॉ. तेजस मराठे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात तर पोलीस नाईक दिपक चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी संतोष हुकमतमल राजपाल आणि एका १७ वर्षीय मुलावर अशा दोघांवर वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे आणि पो.कॉ. विजय निकुंभ करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज