fbpx

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : प्लास्टिक दुकानांवर छापे, ३ ट्रॅक्टर माल जप्त

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । शहरात प्लास्टिक पोटात गेल्याने एका गायीचा मृत्यू झाला होता. जळगाव लाईव्हने याबाबत वृत्त प्रकाशित करीत मनपा प्रशासनावर ताशेरे ओढले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने केलेल्या कारवाईत तब्बल ३ ट्रॅक्‍टर माल मिळून आला आहे.

जळगाव शहरात एका गाईचा प्लास्टिक कॅरीबॅग खाल्ल्याने मृत्यू झाला होता. स्वयंसेवी संस्थांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून देखील तिचा जीव वाचला नाही. गायीच्या पोटात तब्बल ३० ते ३५ किलो प्लास्टिक बॅग, खिळे आढळून आले होते. 

जळगाव लाईव्हने याबाबत वृत्त प्रकाशित करीत निष्काळजीपणा करणारे नागरिक आणि मनपा प्रशासनावर ताशेरे ओढले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्तानंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून बंदी असलेल्या प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

सोमवारी दुपारी पोलन पेठेत असलेल्या शिव प्लास्ट अँड पॅकेजिंग या दुकानावर मनपाने कारवाई केली. सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.पी.अत्तरदे, एल.पी.धांडे, यु.आर.इंगळे, संजय बागुल, सुरेश भालेराव यांच्यासह पथकाने कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज