डमी ग्राहक पाठवून नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यांवर छापे, गुन्हे दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी सरार्स विक्री होत असल्याचे दिसून आले. जळगावात डमी ग्राहक पाठवून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या पाच दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. यात ६ हजार १५० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

याबाबत असे की, मेहरूणमधील तुळजामाता नगरात शुक्रवारी दुपारी १.३० वाजता वडनेरे (पूर्ण नाव माहिती नाही) नामक युवक घरासमोर पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा विक्री करीत असताना एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडून १ हजार ७०० रुपये किमतीचा मांजा जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल साईनाथ मुंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची गुरुवारी दुपारी ४.३० वाजता विक्री करताना आढळून आलेल्या चार दुकानदारांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांनी पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ३ हजार ३५० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

अनिल बळीराम वाणी (रा.रामानंदनगर), अब्दुल हक अब्दुल अजिज (रा. पिंप्राळा) व विजय माखनलाल सोनी (रा. शालिनीनगर पिंप्राळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. सायंकाळी ६ वाजता नायलाॅन मांजा विक्री करताना नीलेश सुरेश सूर्यवंशी (रा. श्रीधरनगर) या दुकानदाराकडून १ हजार १०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेला मिळाली हाेती. वन्यजीव रक्षक जनजागृतीचे पत्रक वितरण करत असताना लपूनछपून मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डमी ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. शुक्रवारी वन्यजीव संस्थेचे जगदीश बैरागी आणि राजेश सोनवणे जनजागृती करत असताना काही दुकानदारांनी स्वतःहून चायना मांजाचे रील आणून दिले. संबंधित पोलिस स्टेशनला जमा करून ते नष्ट करण्यात आले.

या पथकाने केली जनजागृती
शहरातील रामानंदनगर, पिंप्राळा, भागात वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे स्वयंसेवक बाळकृष्ण देवरे, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या नेतृत्वाखाली जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, प्रसाद सोनवणे, ऋषी राजपूत, कृष्णा दुर्गे, नीलेश ढाके, कैलास साळुंखे, चेतन भावसार, किरण कोळी, दुर्गेश आंबेकर यांच्या पथकाने जनजागृती केली.

किरण कोळी, दुर्गेश आंबेकर यांच्या पथकाने जनजागृती केली. वन्यजीव रक्षक जनजागृतीचे पत्रक वितरण करत असताना लपूनछपून मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डमी ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाच्या मदतीने कारवाई करण्यात आली. शुक्रवारी वन्यजीव संस्थेचे जगदीश बैरागी आणि राजेश सोनवणे जनजागृती करत असताना काही दुकानदारांनी स्वतःहून चायना मांजाचे रील आणून दिले. संबंधित पोलिस स्टेशनला जमा करून ते नष्ट करण्यात आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -