राज्यस्तरीय आरोग्य सेवक पुरस्काराने राहुल सूर्यवंशी यांचा सन्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे उपव्यवस्थापक राहुल सूर्यवंशी यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेमार्फत आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री व जिल्हा बँकेचे नूतन चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला आ.चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, पी.ई.तात्या पाटील, ग.स.बँकेचे माजी चेअरमन मनोजकुमार पाटील, दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी, उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांची उपस्थिती होती.

कॅन्सरग्रस्तांसाठी गेल्या आठ वर्षापासून राहुल सूर्यवंशी हे उल्लेखनीय कार्य करत आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना समुपदेशन, गोरगरीब पेशंटला शासकीय योजनांची माहिती देऊन या योजनांसाठी पाठपुरावा करून ते गोरगरिबांना त्याचा लाभ मिळवून देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आजवर त्यांनी अनेक मोफत कॅन्सर तपासणी शिबिर एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलतर्फे घेतले आहेत. समाजात कॅन्सर संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी हेल्थ टॉक शो व लाईव्ह वेबिनार ते आयोजित करत असतात. असंख्य गोरगरिब रुग्णांना याचा फायदा झाला आहे असून या कार्याची दखल राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेने घेतली आहे.

पैशांअभावी जे लोक कॅन्सरचा उपचार घेत नाहीत अशा गोरगरीब रुग्णांनी संपर्क साधल्यास शक्य ती मदत केली जाईल असंही ते या सोहळ्यात म्हणाले. पुढील महिन्यात पाळधी आणि म्हसावद याठिकाणी कॅन्सरचे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार असून यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -