शिरसाड सरपंचांना‎ जातीवाचक‎ शिवीगाळ‎; एकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । शिरसाड ( ता.यावल ) येथील‎ सरपंचांना उद्देशून गावातील एकाने‎ विनाकारण जातीवाचक शब्द‎ उच्चारले. ही घटना सोमवारी‎ दुपारच्या या घटनेप्रकरणी यावल‎ पोलिसांत ऑट्रॉसिटीचा विविध‎ कलमान्वये गुन्हा दाखल झाला.‎यामुळे परिसरात खळबळ उडाली‎ आहे.‎

सविस्तर असे की, शिरसाड येथील सरपंच दीपक‎ वामन इंगळे यांनी दिलेल्या‎ फिर्यादीनुसार ते सोमवारी दुपारी‎ साडेतीन वाजता गावातील पाण्याचे‎ टाकीजवळ इलेक्ट्रिक मोटारीच्या‎ स्टार्टरचे काम करत होते. तेथे‎ गावातील रहिवासी सचिन सुरेश‎ कोळी याने फिर्यादीला उद्देशून तुला‎ सरपंच कोणी केले? असा वाद‎ मुद्दाम उकरून काढला. सरपंचाने‎ त्याला वारंवार समजावून‎ सांगितल्यावर देखील त्याने‎ जातीवाचक शब्द उच्चारले.‎ याप्रकरणी यावल पोलिसांत‎ ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात‎ आला. तपास फैजपूरचे‎ उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.‎ कुणाल सोनवणे, सहाय्यक‎ फौजदार महेंद्र पाटील करत आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -