पीडब्ल्यूडी-मनपा रस्त्यांच्या वादाचा विषय २ दिवसात मार्गी लागेल – पालकमंत्री

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । शहरातील मुख्य सहा रस्ते हे बांधकाम विभागाने २०१७ साली स्वतःकडे हस्तांतरित करून घेतले होते. यामुळे याठिकाणी महापालिकेला रस्त्यांची डागडुजी करायला किंवा नवीन रस्ते तयार करायला कोणताही अधिकार उरलेला नाही. बांधकाम विभागाच्या या पवित्र्यामुळे बांधकाम विभागाचा आणि महानगरपालिकेचा वाद विकोपाला गेला आहे. मात्र याबाबतचा सोक्षमोक्ष दोन दिवसात बैठक घेऊन मी सोडवण्याचा प्रयत्न करतो असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

यावेळी बांधकाम विभागाने आपली बाजू मांडताना सांगितले की, आम्ही हे रस्ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तयार आहोत मात्र त्याच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण हे महानगरपालिकेने हटवायला हवे.

याबाबत महानगरपालिकेचे प्रतिनिधी असलेले नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की, त्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. बांधकाम विभाग केवळ टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -