fbpx

टोकियो ऑलिम्पिक : बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने जिंकलं कांस्य पदक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑगस्ट महिन्याची सुरुवात आशादायी झाली असून बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने कांस्यपदक पटकावले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चालू वर्षात केवळ एक पदक भारताला प्राप्त झाले आहे. या वर्षीच्या सत्रात दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज