कार्यालयीन वेळेतच आजारी पडण्याचा सूचना फलक लावा; दीपककुमार गुप्ता यांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी कार्यालयीन वेळेतच आजारी पडावे, असा सूचना फलक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंप्राळा भागातील एका तरुणीवर शासकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते, या तरुणीची प्रकृती खालावल्याने दिपककुमार गुप्ता यांनी दि.९ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून मदतीची मागणी केली होती. यावेळी अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांनी ‘मला कार्यालयीन वेळेतच फोन करा, मी डीन आहे तर काय करू, मला फक्त कार्यालयीन वेळेतच फोन करा’., असे उत्तर दिले होते. दरम्यान, यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन, शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी फक्त कार्यालयीन वेळेतच आजारी पडावे आणि कार्यालयाची वेळ संपल्यानंतर बरे होऊन घरी जावे, कार्यालयीन वेळेनंतर आजारी पडणाऱ्या रुग्णांनी आपल्या जबाबदारीवर आजारी पडावे, आणि एखादा रुग्ण शासकीय वेळेनंतर मरत असेल तर त्याने उपचारासाठी शासकीय वेळ सुरु होण्याची वाट पाहावी, आपत्कालीन परिस्थितीतही कार्यालयीन वेळेनंतर मला फोन करू नये, असा आशयाचा सूचना फलक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्याची मागणी केली आहे.

बेसिक पगार घ्या
दरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील यांनाही या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यात आपण बेसिक वेतनच घावे, बाकी मिळणारे भत्ते शासकीय ट्रेजरीमध्ये जमा करण्यात यावे, अशी मागणी दिपककुमार गुप्ता यांनी केली आहे.

पहा काय म्हणाले दीपक गुप्ता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज