जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारमधील काही मंत्री गण विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगर मध्ये दि. २० रोजी आले होते. येथील प्रवर्तन चौकातील महापुरुषांना अभिवादन करून कोथळी रोडवरील ग्राउंड वर सभा आयोजित केली होती. सभा आटोपून सर्व मंत्री महोदय हे कोथळी येथील मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती संत मुक्ताई चे दर्शन घेऊन सर्व ताफा जळगाव रवाना झाला होता. दरम्यान, आज युवासेनेतर्फे शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले.
युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रवर्तन चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यात आल्या, गद्दारांना क्षमा नाही अशी घोषणाबाजी करण्यात आली तसेच कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिरात जाऊन मंदिराच्या गाभारा स्वच्छ धुवून गोमूत्र शिंपडून मुक्ताई मंदिरामध्ये शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना सोशल मीडिया शहर प्रसिद्धीप्रमुख सुमेरसिंग राजपूत, सोनू बडगुजर, सचिन हीरोळे, सुमित हीरोळे, पारस हीरोळे, दीपक घुले, तुषार कोळी, महेश खुळे, राजू सोनवणे, तुषार सलावत, शत्रुकन सलावत, निलेश हीरोळे, मुन्ना बोदडे, मयूर वानखेड़े, रविराज वानखेड़े, रोहन भोई ,यश गवई, प्रतीक वाघ ,विवेक हीरोळे ,सौरभ हीरोळे ,अजय सपकाळे, निशांत झाल्टे, परेश तायड़े, रोहन महाले, अक्षय कचरे आदी उद्धव ठाकरे शिवसेना समर्थक आणि पदाधिकारी उपस्थित होते.