fbpx

सावदा येथे लॉकडाऊन काळात दुकाने सुरू करणाऱ्यांवर पालिकेकडून दंडात्मक कार्यवाही

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । सावदा येथे दि 15 रोजी लॉकडाऊन सुरू असताना अत्यावश्यक सेवा वगळता सुरू असलेल्या दुकानावर नगरपालिके तर्फे कार्यवाही करण्यात आली. यात ज्यूसची दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, आईस्क्रीम पार्लर आदी दुकानाचा समावेश असून यांना सर्वांना दंड देण्यात आला असून सोबत 1 मे पूर्वी दुकाने न उघडण्याची नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

यावेळी या पथकात स्वतः मुख्याधिकारी सौरभ जोशी, यांचे सोबत बांधकाम अभियंता अविनाश गवळे, आरोग्य निरीक्षक महेश चौधरी, हमीद तडवी, विजय चौधरी, राजू मोरे यांचे सह कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली.

दरम्यान, आज सावदा येथे दुकानदार तसेच बाहेर इतर फिरणारे मिळून एकूण 224 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 12 जण पोजेटीव्ह मिळून आले असून यातील 3 जण सावदा शहरातील तर उर्वरित 9 जण बाहेर गावातील आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज