fbpx

पाचोरा शहरात संचारबंदी मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘विकेंड’लॉकडाऊन ला संचारबंदी मोडणाऱ्या व विना मास्क फिरणाऱ्यावर आज दि. १७ एप्रिल रोजी  पाचोरा नगरपालिका प्रशासन व ट्राफिक पोलीस यांनी धडक दंडात्मक कारवाई केली.

यात विनाकारण शहरांत फिरणारी होती. सकाळी सुमारे साडेअकरा बारा वाजे परियंत पंधरा ते वीस नागरिकांवर कारवाई करण्यात आली. नगर पालिका कर्मचारी प्रशांत कंडारी यांनी जळगाव लाईव्ह च्या पाचोरा प्रतिधीला दिलेल्या माहिती नुसार नागरिक गरज नसलेली अथवा खोटी ‘मेडिकल’ कारणे सांगून शहरात फिरण्याचा प्रयन्त करीत आहे. 

संचारबंदी असताना सुद्धा नागरिक वेगवेगळी नपटणारी कारणे देत आहे यामुळे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना विन्नती केली आहे की विनाकारण शहरात फिरू नऐ घरीच थांबावे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज