त्या १० ग्राहकांवर दंडात्मक कारवाई

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । अयोध्या नगर व ऑटो नगरातील १० ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांचे मीटर ९ रोजी जप्त करण्यात आले आहेत. महावितरणतर्फे गेल्या काही महिन्यांपासून वीज मीटर तपासणी मोहीम सुरू आहे. त्यातून हे समोर आले.

महावितरणचे एमआयडीसी कक्षाचे प्रमुख सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील ५० घरातील नागरिकांचे मीटर तपासले.यावेळी १० ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. त्यांचे मीटर जप्त करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच २ लाखांच्या घरात वीज चोरी पकडण्यात आली आहे.

या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईत तंत्रज्ञ सुरेखा डोळे, शिव हरी आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -