महिलेचा विनयभंग करणाऱ्याला शिक्षा, दोन वर्ष कारावास आणि दंड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १२ मे २०१८ रोजी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयात कामकाज चालले असता तीन वर्षांनी निकाल लागला. न्यायालयाने आरोपी नितीन पाटील याला दोन वर्षांचा कारावस व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बदरखे येथील एका महिलेचा १२ मे २०१८ रोजी आरोपी नितीन पाटील याने विनयभंग केला होता. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात चार साक्षीदार तपासले होते. न्यायालयाने निर्णय देत आरोपीला दोन वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याचा कारावास वाढवण्यात येणार आहे. आरोपीतर्फे ऍड.दीपक पाटील यांनी तर फिर्यादी महिलेतर्फे सरकारी वकील आर.के.माने यांनी काम पाहिले. तर कोर्ट पेरवी म्हणून दीपक पाटील यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -