आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । ‎पाचोरा न्यायालयाने पकड वारं‎ बजावल्यानंतर अटक करुन घेऊन‎ जात असलेल्या आरोपीला‎ पोलिसाच्या ताब्यातून हिसकावून‎ पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात‎ आला होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस‎ ठाण्यात दाखल असलेल्या या‎ गुन्ह्यात शुक्रवारी तदर्थ जिल्हा सत्र‎ न्यायाधीशांनी आरोपीला ६ महिने‎ सक्त मजुरी व दीड हजार रुपयांच्या‎ ‎दंडाची शिक्षा सुनावली आहे.‎ भाऊसाहेब त्र्यंबक पाटील (रा.‎ भामरे बु. ता. चाळीसगाव) असे‎ शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव‎ आहे.

२६ ऑक्टोबर २०१९ रोजी‎ नियमित फौजदारी खटल्यास प्रथम‎ न्यायदंडाधिकारी पाचाेरा यांनी‎ भादंवी कलम १४८ मधील आरोपी‎ दत्तात्रय नाना पाटील (रा. भामरे बु,‎ ता. चाळीसगाव) यास पकड वारं‎ जारी केले होते. त्यानुसार पोलिस‎ कॉन्स्टेबल सुभाष भीमराव पाटील हे‎‎ आरोपी दत्तात्रय याला अटक करुन‎ चाळीसगाव पोलिस ठाण्यात घेऊन‎ जात होते. पोलिस ठाण्यासमोर‎ भाऊसाहेब पाटील आला. त्याने‎ आरोपीला अटक करु नका, नाही‎ तर तुम्हाला महागात पडेल,‎ तुमच्याविरुध्द खोटे अर्ज करेल, बदनामी करेल अशी पोलिसाला‎ धमकी दिली. तसेच त्यांच्या ताब्यातून दत्तात्रय‎ याला हिसकावून नेण्याचा प्रयत्न‎ केला. शांततेचा भंग करुन सरकारी‎ कामात अडथळा निर्माण केला.‎ सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन‎ त्याच्याविरुध्द चाळीसगाव पोलिस‎ ठाण्यात २५ ऑक्टोबर गुन्हा दाखल‎ करण्यात आलेला आहे.

या‎ खटल्यात तदर्थ जिल्हा व सत्र‎ न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांच्या‎ न्यायालयात सुनावणी झाली. पाच‎ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात‎ आली. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शीची‎ साक्ष महत्वपूर्ण ठरली.‎ सरकारपक्षातर्फे भारती खडसे यांनी‎ कामकाज पाहिले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -