fbpx

पुनगावचे विद्युत पोल, वाहिन्या धोकादायक : ग्रामपंचायतचे महावितरणला पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । चोपडा तालुक्यातील मौजे – पुनगाव येथे पुनगाव ग्रामपंचायत गावठाणात वीजपुरवठा तारा व इले पोल हे जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा नियमित खंडित होत असतो.

बऱ्याच ठिकाणी तारा खंडित असून लोखंडी पोलही गंजून जीर्ण झाल्याने जीवितास धोका संभवतो. तरी गावात नवीन पोल व तार ऐवजी केबल टाकून मिळण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जेणेकरून धोका टळून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण, तसेच वीजचोरीना आळा बसेल. ग्रामस्थ देखील याबाबत सकारात्मक असून गावठाणात त्वरित नवीन पोलव केबल टाकून मिळण्याची मागणी केलीय.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज