‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । गेल्या २० वर्षांपासून जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे सचिव संजय चव्हाण हे पार्टीचे विचार, तत्व, संकल्पना व कार्य तसेच पार्टीचे अध्यक्ष ना.शरद पवार यांचे कर्तृत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या उद्देशाने ‘साहेब’ या दिनदर्शिकेचे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशन करीत असतात.

यंदा या दिनदर्शिकेचे २१ वे वर्ष होते. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर्षी वयाची ८१ वर्षे पूर्ण केली. पुणे येथेएका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील, राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तामामा भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संजय चव्हाण यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील राजेश वानखेडे, विजय चौधरी, ‌सोपान पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -