fbpx

एमपीएससी मुख्यपरीक्षेसाठी सौरभ जोशी व राहुल कुलकर्णी लिखित “कायदा साध्या आणी सोप्या भाषेत” पुस्तकाचे प्रकाशन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२१ । दिपक श्रावगे ।  राज्य सेवा (एम.पी.एस.सी) प्रवेश परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्यपरीक्षा हे एक आवाहन असते व यातील कायदा हा विषय या परीक्षेतील विद्यार्थ्यांना सोप्या व सरळ भाषेत समजावा यासाठी उपयुक्त मुख्यपरीक्षा पेपर २ आणी ३ यातील “कायदा” ह्या विषयी “कायदा साध्या आणी सोप्या भाषेत” या पुस्तकाचे लेखन व संकलन सावदा येथील कर्त्यव्यदक्ष मुख्याधिकारी सौरभ जोशी व जालना व सध्या पुणे येथे असलेल्या राहुल कुलकर्णी यांनी केले असून सदर पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले ते पुणे येथे देखील उपलब्ध असणार आहे,.

दि १ जुलै २०२० च्या सुधारीत अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तक “कायदा साध्या आणी सोप्या भाषेत” हे असून यात मुख्यपरीक्षा २ साठी सुमारे १३ “चेप्टर” (धडे) असून यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार, नागरी हक्क संरक्षण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, पर्यावरण संरक्षण अधिनियम, मानवी हक्क संरक्षण,महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आदी बाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे, तर मुख्यपरीक्षा ३ साठी ४ “चेप्टर” (धडे) आहेत यात बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम, ग्राहक संरक्षण कायदा, अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (जंगलविषयक अधिकार कायदा) अधिनियम या बाबत संपूर्ण प्रश्नावली सह माहिती देण्यात आली आहे,

या पुस्तकात विविध कायद्या बाबत तपशीलवार माहिती असून कायदा त्याची पार्श्वभूमी व इतर आनुषंगीक माहिती मूळ कायदा व त्यावरील संभाव्य प्रश्न आदी माहिती असून सुमारे ३३० पानांचे हे पुस्तक एम.पी.एस.सी. मुख्यपरीक्षेसाठीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहे.

ह्या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे यात * सर्व कायदे अद्यावत सुधारणासह दिले आहेत, प्रत्येक कायद्याची पार्श्वभूमी तथा प्रस्तावना,आवश्यक तिथे इंग्रजी शब्दांचा समावेश, सुधारित कायद्यांवर सराव प्रश्नसंच,जुन्या कायद्यावरील आयोगाच्या मागील प्रश्नाचां समावेश,जम्मू आणी काश्मीर राज्य पुनर्रचना अधिनियम २०१९ च्या समावेशासह हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, पुणे येथील नामांकित ब्ल्यू कॅप पब्लिकेशन्स तर्फे हे पुस्तक प्रकाशित होणार आहे तर मुक्ताई बुक सेंटर, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ पुणे मो.नं. ९०११९७२१५७ व ८०१२१८५५५५ येथे हे उपलब्ध असणार आहे.

सौरभ जोशी व राहुल कुलकर्णी 

यापुस्तका बाबत बोलतांना मुख्याधिकारी सौरभ जोशी व राहुल कुलकर्णी यांनी सांगितले की सदर सुमारे एक वर्षापासून संकलन व लेखन सुरु असून ते आपली सर्व दैनदिन कामे सांभाळून त्यांनी हे सुमारे ३३० पानांचे पुस्तक लिखाण केले असून एम.पी.एस.सी साठीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा हाच या मागचा उद्देश असून पुस्तक प्रकाश झाल्यावर लवकरच एम.पी.एस.सी मुख्यपरीक्षा असून यात अभ्यासक्रमा साठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज