महामार्गावरील अतिक्रमणकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील मौजे जानवे येथे प्लॅट नंबर ३६ याचा ग्राम पंचायत घर नं ८४७/२ च्या उत्तरेकडील सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर सुनील भगवान पाटील हा बांधकाम करून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत धुळे – अमळनेर महामार्गाच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत घर बांधत आहे.

त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करून सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर केलेले बांधकाम हटवावे व तमाम जनतेच्या वापरास रस्ता मोकळा करावा व वापराच्या अधिकारास बाधा येणार नाही याविषयी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तक्रार दिपक भटू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -