पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे शांताताई शेळके यांचे जीवनावर जाहीर व्याख्यान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । सावदा येथे ६ रोजी पत्रकार दिनानिमित्त ओरिजनल पत्रकार संघ सावदा यांच्यातर्फे जेष्ठ कवियत्री तथा पत्रकार शांताताई शेळके यांचे जीवनावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे वाख्याते नितीन मटकरी प्राध्यापक के.सी.ई. सोसायटी जळगाव हे असून सदर कार्यक्रम सावदा येथील विश्रामगृहा समोरील प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार असल्याचे आवाहन ओरिजनल पत्रकार संघा तर्फे करण्यात आले.

यावेळी कोरोना काळात मयतांवर अंत्यसंस्कार करणारे कोरोना योद्धा तसेच जेष्ठपत्रकार समाजसेवी व्यक्ती यांचा सत्कार देखील आयोजीत करण्यात आला असून, याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चंद्रकांत पाटील तर उद्दघाटक म्हणून प्रांतअधिकारी फैजपूर कैलास कडलग हे राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी किशोर चव्हाण, स.पो.नी. सावदा देविदास इंगोले, कु. वैशाली प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालय सावदा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

सर्व कोरोना नियम पाळून सदर कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ओरिजनल पत्रकार संघ सावदा तर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -