१५ ते १८ वयोगटासाठी ग्रामीण भागातही लसीकरण उपलब्ध करा : जिल्हा काँग्रेस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । १५ ते १८ वर्ष वयातील मुला – मुलींना ग्रामीण भागात लसीकरण उपलब्ध करून द्या, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी संजय चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली.

पंधरा ते अठरा वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींना कुंसुंबा, चिंचोली, रायपुर, धानवड, उमाळा, कंडारी, मन्यारखेडा, तरसोद या ग्रामीण भागात लसीकरण उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने चालू केलेल्या 15 ते 18 वयोगटातील मुला मुलींसाठी लसीकरण हे फक्त शहरी भागात व आरोग्य केंद्र आहेत तिथे चालू असल्याने इतर ग्रामीण भागात अजूनही पंधरा ते अठरा वर्षाचे बरीच संख्या लसीकरणापासून वंचित आहे. व ओमिक्रोन या कोरोनाव्हायरस चा वाढता धोका लक्षात घेता, शंभर टक्के 15 ते 18 वर्षातील मुलां, मुली यांचे लसीकरण त्या त्या गावात किंवा त्या त्या परिसरात जाऊन लसीकरण व्हावे, अशी मागणी केली.

याप्रसंगी जळगाव काँग्रेसचे प्रमोद गंगाधर घुगे, भाऊसाहेब सोनवणे, शैलेश साळुंखे, अशोक पाटील, अर्जुन सोनवणे व नीलेश बोरा हे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच डॉक्टर संजय चव्हाण यांनी तुमच्या मागणीला 100% सहकार्य राहील व लवकरात लवकर आपल्याकडे पंधरा ते अठरा वयोगटातील मुलां, मुलींना लसीकरण उपलब्ध करून देण्यात येईल हा शब्द दिला.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -