⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मुक्ताईनगरला राष्ट्रवादीतर्फे तानाजी सावंतचा निषेध!

मुक्ताईनगरला राष्ट्रवादीतर्फे तानाजी सावंतचा निषेध!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शिंदे सरकारमध्ये असलेले मंत्री तानाजी सावंतने मराठ्यांना आताच आरक्षणाची खाज सुटली का..? ” असे आक्षेपार्ह विधान केले होते. मुक्ताईननगरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा जिल्हा अध्यक्ष भैय्या पाटील, ऍड. रोहीणी खडसे यांच्या मार्गदर्शना खाली व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्तित सावंत यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा फोटो निषेध म्हणून जाळण्यात आला.

तसेच सदर च्या बेताल वक्तव्यामुळे फक्त मराठा सामाज्याच्याच नव्हे तर अठरापगड बाराबलुतेदार व सर्वच जाती धर्मच्या भावना दुखावल्या गेल्या आहे, तरी या सरकार मध्ये मराठ्यांनबद्दल संवेदनशीलता असेल तर त्यांनी येत्या 2 दिवसात तानाजी सावंत चा राजीनामा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या विरोधामध्ये जण आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत तहसीलदार श्वेता संचेती व पोलीस निरीक्षक शंकर शेळके साहेब यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस ईश्वर राहणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी सभापती विकास समाधान पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर , जिल्हा उप अध्यक्ष ऍड. पवनराजे पाटील , वक्ता सेल चे जिल्हा अध्यक्ष विशाल महाराज खोले , कार्य अध्यक्ष सोपान दुट्ये , शेषराव पाटील , तालुका सरचिटणीस रवी दांडगे , बापू ससाणे, सोनू पाटील, शहर अध्यक्ष बबलू सपधारे , दीपक साळुंखे , मुन्ना बोन्डे , प्रवीण दामोदरे , हरलाल राठोड , सईद खान , संदीप पाटोळे , संतोष पाटील , निखिल पाटील , चंद्रकांत पाटील , प्रदीप पाटील , नितीन पाटील , सारंगराजे, वैभव पाटील , कपिल पाटील , शरीफ शेख ,ऍड. राहुल पाटील , रोशन पाटील , योगेश पाटील , आकाश सुरवाडे , पवन कऱ्हाड , राकेश कऱ्हाड , मनोज इंगळे , जयराज इंगळे , सोपान कोळी , ज्ञानेश्वर भोई , सद्दाम शेख , हातिम भाई , अल्ताफ भाऊ ,वैभव पाटील , विशाल पाटील , विवेक पाटील , मयूर साठे, आशीष घोगरे , स्वप्नील सोनावणे , दीपक ठाकरे , गौरव साळुंखे , कुंदन महाजन , जय सोनावणे, पंढरीनाथ पाटील यांच्या सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह